खराडी (पुणे) येथे वरिष्ठ (सिनियर) राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्राच्या पै.पृथ्वीराज मोहोळ व पै. सोनबा गोगाणे यांनी जिंकले सुवर्णपदक
पुणे : भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने आयोजित वरीष्ठ (सिनियर) राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धाना खराडी, पुणे येथे सोमवारी (ता.२९) उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे उदघाटन भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह व पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी आमदार बापुसाहेब पठारे, पंढरीनाथ पठारे, पै. योगेश दोडके, पै. संदीप भोंडवे, स्पर्धा प्रमुख व्ही एन प्रसुद, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, पै.मेघराज कटके, पै.नवनाथ घुले, पै.सचिन पलांडे उपस्थित होते. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत स्पर्धा आयोजक जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले तर स्पर्धा आयोजक सुरेंद्र पठारे यांनी आभार मानले.
आपल्या स्वागतपर भाषणात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्रात २३ वर्षांनी सिनियर नॅशनल स्पर्धा होत असल्याचे सांगत महाराष्ट्रातील कुस्तीगीर भविष्यात नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला, तर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी या स्पर्धेत विजयी झालेले कुस्तीगीर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचे नेतृत्व करतील, असे नमूद केले.
फ्रीस्टाईलच्या १० वजनगटातील कुस्ती स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांनीही चमकदार कामगिरी करत पदके प्राप्त केली.
वजनगट निहाय विजेत्यांमध्ये : ६५ कीलो – पै.सोनबा गोंगाणे ( सुवर्णपदक) १२५ कीलो – पै.पृथ्वीराज मोहोळ ( सुवर्णपदक) ५७ कीलो – पै. आतिष तोडकर ( रौप्यपदक)९७ कीलो – पै. प्रतिक जगताप ( रौप्यपदक)६१ कीलो – पै. वैभव पाटील ( ब्रांझ पदक) ९२ कीलो – पै. संग्राम पाटील ( ब्रांझ पदक) आदींचा समावेश आहे.
दिल्ली संघाने १६६ गुणांकासह जनरल चॅम्पियनशिप जिंकली, तर १४० गुणांसह महाराष्ट्र संघाने चॅम्पियनशिपमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. मंगळवारी (ता.३०) ग्रिकोरोमन प्रकारातील कुस्ती स्पर्धा होणार असुन ३१ जानेवारीला महीला विभागातील स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
५७ किलो – प्रथम – राहुल (दिल्ली )द्वितीय – आतिष तोडकर ( महाराष्ट्र )तृतीय – हीतेश कुमार ( हरीयाना ) तृतीय – जनार्दन यादव ( उत्तर प्रदेश)
६१ किलो – प्रथम – अभिषेक ढाका – उत्तर प्रदेश द्वितीय – निखिल कुमार – दील्ली, तृतीय – ललित कौशल्य – मध्य प्रदेश, तृतीय – वैभव पाटील – महाराष्ट्र
६५ किलो – प्रथम – सोनबा गोंगाणे – महाराष्ट्र , द्वितीय – विजय मलिक – चंदिगड,तृतीय – आयुष ओमवीर- उत्तर प्रदेश , तृतीय – मनिष गोस्वामी – दिल्ली.
७० किलो – प्रथम – अभिमन्यु सिंग – दिल्ली, द्वितीय – महेश कुमार – कर्नाटक , तृतीय – शुभम सिंग – उत्तर प्रदेश , तृतीय – मोहीत अशोक – हरीयाना
७४ किलो – प्रथम – सौरभ सेहरवाल – दिल्ली, द्वितीय – तेजवीर सिंह – उत्तर प्रदेश ,तृतीय – रोहन नारायण – कर्नाटक , तृतीय – बाॅबी चहर – चंदिगड
७९ किलो – प्रथम – परविंदर सिंह – हरीयाना , द्वितीय – सदाशिव नलावडे – कर्नाटक ,तृतीय – रितीक पनवर – उत्तर प्रदेश ,तृतीय – मोहीत राजकुमार – दिल्ली
८६ किलो – प्रथम – जाॅन्टी सिंग – उत्तर प्रदेश ,द्वितीय – गोपाल कोली – कर्नाटक ,तृतीय – अभिषेक यादव – गुजरात ,तृतीय – आशिष कुमार – दिल्ली
९२ किलो – प्रथम – कुणाल कुमार – हरीयाना ,द्वितीय – अजय बाल सिंग – हीमाचल ,तृतीय – दीपक सिंग – राजस्थान ,तृतीय – संग्राम पाटील – महाराष्ट्र
९७ किलो – प्रथम – सुनिल फडतरे – कर्नाटक , द्वितीय – प्रतिक जगताप – महाराष्ट्र ,तृतीय – तरुण आचार्य – मध्यप्रदेश ,तृतीय – नदीम इकबाल – जम्मू-कश्मीर ,
१२५ किलो – प्रथम – पृथ्वीराज मोहोळ – महाराष्ट्र , द्वितीय – लक्ष शेरावत – दिल्ली, तृतीय – समीर सतिश – हरीयाना , तृतीय – भरत सिंग – उत्तर प्रदेश
………..