आयोध्येतील श्रीराम उत्सवानिमित्त पिंपळे जगताप येथे महाअभिषेक, ग्रामप्रदक्षिणा, दिपोत्सव, महाप्रसाद व महाआरतीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन
श्रीराम उत्सवानिमित्त गावात मद्य व मांसाहार विक्री बंद ठेवण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन
पुणे : श्रीक्षेत्र आयोध्या धाम येथे येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथेही श्रीराम मंदिरात मोठा उत्सव साजरा होत असून या दिवशी महाअभिषेक, ग्रामप्रदक्षिणा, दिपोत्सव, महाप्रसाद व महाआरतीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवानिमित्त पिंपळे जगताप हद्दीत मद्य व मांसाहार विक्रीही बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमवारी २२ जानेवारीला आयोध्येतील श्रीराम उत्सवानिमित्त पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथेही श्रीराम मंदिरात मोठा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी या दिवशी पिंपळे जगताप हद्दीत मद्य व मांसाहार विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी तसेच हॉटेल व ढाबा मालकांनीही मद्य व मांसाहार विक्री बंद ठेवून या मंगल उत्सवाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.
तर सोमवारी पिंपळे जगताप येथे श्री हनुमान मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सकाळी ७ वाजता प्रभु श्रीरामास महाअभिषेक करण्यात येणार आहे. तर सकाळी ८.३० ते १० पर्यंत श्रीराम ग्रामप्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते ११.३० पर्यंत भजन कार्यक्रम होईल तर दुपारी १२ ते ३ पर्यंत ग्रामस्थांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ ते ८ या दरम्यान मंदिरात दिपोत्सव व महाआरती होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
——————