आयोध्येतील श्रीराम उत्सवानिमित्त पेरणे येथे मद्य व मांसाहार विक्री बंद ठेवण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन
येत्या २२ जानेवारीला आयोध्येतील श्रीराम उत्सवानिमित्त पेरणे गावामध्येही श्रीराम मंदिरात साजरा होणार मोठा उत्सव
पुणे : श्रीक्षेत्र आयोध्या धाम येथे येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त पेरणे (ता. हवेली) येथेही श्रीराम मंदिरात मोठा उत्सव साजरा होत असून या दिवशी पेरणे हद्दीत मद्य व मांसाहार विक्री बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत पेरणे ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. उषा दशरथ वाळके, उपसरपंच सौ. सारीका दिपक वाळके यांनी पत्राद्वारे आवाहन केले आहे की, येत्या २२ जानेवारीला आयोध्येतील श्रीराम उत्सवानिमित्त पेरणे गावामध्येही श्रीराम मंदिरात मोठा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी या दिवशी पेरणे हद्दीत मद्य व मांसाहार विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी तसेच हॉटेल व ढाबा मालकांनीही मद्य व मांसाहार विक्री बंद ठेवून या मंगल उत्सवाला सहकार्य करावे, असे आवाहन पेरणे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.
———————