शरीर व मनाच्या तंदुरुस्तीसाठी खेळ आवश्यक – प्रदीपदादा कंद
लोणीकंद येथे कुस्ती स्पर्धेने शिरुर विधानसभा नमो चषकास शानदार प्रारंभ
पुणे : शरीर व मन निरोगी तसेच तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यासाठी युवापिढीने खेळाची आवड जपली पाहिजे, असे मत भाजपा शिरुर विधानसभा प्रमुख प्रदीपदादा कंद यांनी व्यक्त केले.
युवा वर्गात व्यायाम व कसरतीची आवड निर्माण व्हावी, तसेच खेळाडुंना आपले क्रीडा नैपुण्य दाखवता यावे, या करीता भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभास्तरावर ‘नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शिरुर – हवेली विधानसभा मतदार संघातही नमो क्रीडा महोत्सव ३० जानेवारी पर्यंत सुरु आहे. यात कुस्ती, क्रीकेट, खो खो, कब्बडी, अॅथलेटिक्स, चित्रकला, रांगोळी , नृत्य व वकृत्व या स्पर्धा भाजपा विधानसभा प्रमुख प्रदीपदादा कंद यांच्या नियोजनाखाली संपन्न होणार आहेत. लोणीकंद येथे जाणता राजा कुस्ती केंद्रावर कुस्ती स्पर्धेने नमो चषकाची शानदार सुरुवात झाली असुन या स्पर्धेसाठी शिरुर विधानसभा मतदार संघातुन एकुण २४२ कुस्तीगीर सहभागी झाले.
स्पर्धेचा शुभारंभ भाजपा विधानसभा प्रमुख प्रदीपदादा कंद यांच्या अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडीचे अध्यक्ष पै.संदीप भोंडवे यांच्या उपस्थितीत झाला. तर या स्पर्धेस शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव, हवेली भाजपा अध्यक्ष शामराव गावडे, शिरुर भाजपा अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, हवेली तालुका सरचिटणीस गणेश चौधरी, पीएमआरडीचे सदस्य स्वप्निल उंद्रे, हवेली क्रीडा आघाडी अध्यक्ष शिवाजीराव महाडीक, पै. मेघराज कटके, पै.भरत मस्के, बाळासाहेब मल्लाव, पै.सचिन पलांडे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेस पंच म्हणून मारुती सातव, तुषार गोळे, प्रदीप बोत्रे, काळुराम लोखंडे, शिल्पा धुमाळ, साईनाथ भोंडवे आदी उपस्थित होते
——————–
स्पर्धेचा वजनगट निहाय निकाल पुढील प्रमाणे :
३० किलो प्रथम – पै.समर्थ तरंगे, द्वितीय – पै.समर्थ चोरमले,
३५ किलो – प्रथम – पै.जय हरगुडे, द्वितीय – पै.रणवीर गव्हाणे
४० किलो – प्रथम – पै.राजवीर गव्हाणे, द्वितीय – पै.सोहम घाईतडक
४५ किलो – प्रथम – पै.सार्थक लोखंडे, द्वितीय – पै.साई दळवी
५० किलो – प्रथम – पै.वक्रतुंड फदाले, द्वितीय – पै.मयुर जाधव
५७ किलो – प्रथम – पै.उत्कर्ष ढमाळ, द्वितीय – पै.जय शेडगे
६५ किलो – प्रथम – पै.सनी फुलमाळी, द्वितीय – पै.अमित कुलाळ
७० किलो – प्रथम – पै.ओंकार काटकर, द्वितीय – पै.यश कोळपे
७४ किलो – प्रथम – पै.आबा शेडगे, द्वितीय – पै.किरण दळवी
७४ ते १२५ कीलो (खुला गट) प्रथम – पै.अंबर सातव, द्वितीय – पै.ओंकार येलभर
——————-