श्री रामचंद्र कॉलेजमध्ये ‘एआय अँड डेटा सायन्स’बाबत पुणे विद्यापीठाच्या विद्यमाने विद्यार्थ्यांना अद्ययावत मार्गदर्शन
आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स अभ्यासाचा विद्यार्थाना भविष्यात फायदा - भुमकर
पुणे : येत्या काळात आर्टीफिशिअल इंटेलिजन्सची गरज ओळखून लोणीकंद येथील श्री रामचंद्र इंजिनीरिंग कॉलेजनेही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AI & DS ) क्षेत्रातील आव्हाने व त्याची जगाला असणारी गरज’ याबद्दलमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अद्ययावत मार्गदर्शन करण्यात आले.
लोणीकंद (ता. हवेली) येथे श्री रामचंद्र इंजिनीरिंग कॉलेजमध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनीरिंगच्या वैकल्पिक विषयावर (Elective Subject -VI) फॅकल्टी ओरिएंटेशन प्रोग्रामही घेण्यात आला. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांनीही सहभाग नोंदवला. आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनीरिंगचा अभ्यासक्रम तयार केलेल्या संबंधित विषयाच्या तज्ञ प्रशिक्षकांनीही या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
यामध्ये प्रा. दिनेश भदाणे, प्रा. विक्रम अभंग, प्रा. पी. घोरपडे, प्रा. वैशाली इंगळे, प्रा. ऋचा अग्रवाल यांनीही उपस्थित शिक्षकांना आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनीरिंगच्या वैकल्पिक विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. आर. भूमकर यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यशाळेत तज्ञ शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विद्यार्थाना भविष्यात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करुन तज्ञ प्रशिक्षकांच्या प्रभावी मार्गदर्शनाचे कौतुक केले. तर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुजाता राव यांनीही या क्षेत्रातील भविष्यकालीन आधुनिकतेवर परिणाम करणारे मुद्दे अधोरेखित करीत या क्षेत्रातील आव्हाने तसेच त्याची विश्वाला असलेली गरज याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या महत्वाच्या विषयावर कार्यशाळा घेतल्याबद्दल श्री रामचंद्र कॉलेजचे आभारही मानन्यात आले. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. विकास गायकवाड व सहकाऱ्यांनी काम पाहिले तर प्रा. गिरीशा बोंबले यांनी प्रास्ताविक केले.