आमदार अपात्रता निकालाच्या निषेधार्थ वाघोलीत जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर (आबा) कटके यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन
जनता माफ करणार नाही. येत्या निवडणुकीत त्यांना निकालातून चांगलाच धडा शिकवेल - ज्ञानेश्वर (आबा) कटके
पुणे : आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाच्या निषेधार्थ वाघोली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर (आबा) कटके यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत निषेध केला. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करीत हातात निषेधाचे काळे फलक घेऊन वाघोलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.
शिंदे गटाच्या १६ आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे सरकारच्या बाजूने दिलेल्या निर्णयाचा यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांनी तिव्र शब्दांत निषेध केला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे घटना मोडीत काढल्याचा प्रकार असल्याचे सांगत कटके यांनी त्यावर जाेरदार टिका केली.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जि.प.सदस्य ज्ञानेश्वर कटके यांच्यासमवेत युवा सेना जिल्हाप्रमुख मचिंद्र सातव, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख युवराज दळवी, सागर गोरे, अशोक कदम, गणेश येवले, दादा पडवळ, राहुल सातव, किरण राऊत, सुरेश पवार, राम जगधाने, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्रद्धा कदम, वंदना घोलप,अलका सोनवणे,अश्विनी सावंत आदी शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल.. – ज्ञानेश्वर आबा कटके
यावेळी बोलताना ज्ञानेश्वर कटके म्हणाले, शिवसेना कोणाची ? हे लहान मुलगाही सांगेल, मात्र सध्या राज्यात आम्ही सांगू तोच कायदा असे दडपशाहीचे प्रकार सुरु आहेत. त्यातूनच काल चुकीचा निकाल देवून लाेकशाहीचा गळा घोटण्यात आला. याबाबत जनतेत तीव्र संतापाची भावना असून जनता अशा लोकांना माफ करणार नाही. येत्या निवडणुकीत जनता त्यांना निकालातून चांगलाच धडा निश्चीतपणे शिकवेल, असा विश्वास व्यक्त करीत कटके व कार्यकर्त्यांनी या निकालाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.