पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र महादबा गव्हाणे पाटील यांची नियुक्ती
पक्षसंघटनासाठी प्रभावीपणे काम करणार-राजेंद्र गव्हाणे पाटील
पुणे : डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील राजेंद्र महादबा गव्हाणे पाटील यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजितदादा पवार गट) पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राजेंद्र गव्हाणे पाटील यांना निवडीचे पत्र दिले. तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्तेही त्यांना सन्मानित करण्यात आले.
पक्षप्रमुख व विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धेय धोरणे, आचार-विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे राजेंद्र गव्हाणे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान शिरूर तालुकाध्यक्ष व नियोजन समिती सदस्य रवींद्र काळे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा मोनिकाताई हरगुडे, शिरूर तालुका महिलाध्यक्षा आरती भुजबळ, पुणे जिल्हा क्रीडा समिती अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे, शिरूर शहर महिला अध्यक्षा श्रुतिका झांबरे, शिरु तालुका युवती अध्यक्षा तज्ञिका कर्डीले, शिरूर तालुका विद्यार्थी अध्यक्ष अमित गव्हाणे यांनी राजेंद्र गव्हाणे पाटील यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.