लोकसेवा संकुलातील मुलांचा चित्रे काढून युवा संघर्ष यात्रेला पाठिंबा, चित्रे पाहून रोहित पवार भारावले.
‘युवा संघर्ष यात्रे’ दरम्यान फुलगावात सैनिकी शाळेचा उपक्रम
पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या ‘युवा संघर्ष यात्रे’ दरम्यान पदयात्रेच्या मार्गावर लोकसेवा प्रतिष्ठाण संचालित सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील १०० मुलामुलींनी रोहित पवार यांची अल्पावधित सुंदर चित्रे काढून त्यांच्या युवा संघर्ष यात्रेला पाठिंबा दिला. लोकसेवा संकुलातील मुलांनी काढलेल्या चित्राने रोहित पवारही भारावले. मुलांच्या चित्रांचे कौतुक करुन त्यांनी मुलामुलींयी संवादइ साधत त्यांना मार्गदर्शनही केले. या अनोख्या उपक्रमासाठी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिपक पायगुडे, प्राचार्य अमर क्षिरसागर, कलासंचालक शंकर साळुंके आदींनी पुढाकार घेतला.