पुण्यात इंगळे व बराटे या दोघी नणंद-भावजय झाल्या नगरसेविका, संतोष बराटे यांचे नगरसेवक पदाचे स्वप्न अखेर साकार.
नणंद-भावजयी एकाच वेळी नगरसेविका झाल्याने बराटे व इंगळे परिवारासह नातेवाईक व मित्र परिवारात उत्साहाचे वातावरण

पुणे : महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुक रिंगणामध्ये उतरून आपले नशीब आजमावणाऱ्या अनेक जोड्यापैकी काही जोड्यांना यश मिळाल्याचे दिसून येते. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या आज झालेल्या मतमोजणीमध्येही नणंद-भावजयीची अशीच एक जोडी विजयी झाली आहे.
प्रभाग क्रमांक ३३ – ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सौ.अनिता तुकाराम इंगळे या विजयी झालेल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक ३० – ब मध्ये त्यांच्या भावजय व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ.रेश्मा संतोष बराटे यांचाही विजय झाला आहे.
कर्वेनगर येथील बराटे कुटुंबातील कन्या असलेल्या सौ.अनिता तुकाराम इंगळे यांनी पुण्यातील शिवणे परिसरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभावी काम करीत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये उत्तम यश मिळवले आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले आहे.
तर गेली अनेक वर्ष कर्वेनगर परिसरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ.रेश्मा संतोष बराटे या प्रथमच नगरसेविका म्हणून विजयी झालेल्या आहेत. गतवेळच्या निवडणुकीत त्यांचे पती संतोष बराटे यांचे अपूर्ण राहिलेले नगरसेवक पदाचे स्वप्न पत्नी तसेच बहिणीने एकाच वेळी साकार केले आहे.
नणंद-भावजयींच्या या विजयाने कार्यकर्त्यांसह दोन्ही परिवार तसेच नातेवाईक व मित्रपरिवारात अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. तर पत्नी व बहीण दोघीही नगरसेविका झाल्याने संतोष बराटे व त्यांच्या कुटुंबियांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे.
……


