प्रसिद्ध ‘गिरीराज ज्वेलर्स’च्या कोरेगाव भीमा येथील स्वमालकीच्या वास्तूतील नव्या शाखेचा दिमाखात शुभारंभ !

शुभारंभानिमित्त सर्व शाखांमध्ये सुरु असलेल्या ‘पाच का धमाका’ या ऑफरला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पुणे : प्रसिद्ध ‘गिरीराज ज्वेलर्स’च्या कोरेगाव भीमा येथील स्वमालकीच्या ‘गिरीराज कॉम्प्लेक्स’ या भव्य वास्तुतील सुवर्ण दालनांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात शुभारंभ झाला.

शुभारंभानिमित्त सर्व शाखांमध्ये सुरु असलेल्या ‘पाच का धमाका’ या ऑफरला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.

     ‘गिरिराज ज्वेलर्स’ ने नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा येथे स्व-मालकीच्या ५५५५ हजार चौरस फूट जागेत अत्याधुनिक सेवांसह ‘गिरीराज कॉम्प्लेक्स’ ही भव्य इमारत उभारली आहे. प्रशस्त पार्किंग, आकर्षक वास्तुकला आणि  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या या प्रशस्त कॉम्प्लेक्समध्ये सोने व चांदीच्या आधुनिक फॅशन्स आणि विविध डिझाईन्सच्या दागिन्यांसह डायमंड दागिन्यांच्याही अनेक व्हरायटीज माफक दरात उपलब्ध झाल्याने दसरा दिवाळीच्या पार्श्वभुमीवर ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

     या शुभारंभ प्रसंगी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके, माजी आमदार ॲड. अशोक पवार, अप्पर जिल्हाधिकारी समिक्षा गोकुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद गोकुळे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, येरवडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड, लोणीकंदचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, वाघोलीचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे, जयपूर येथील जे.के.जे.ज्वेलर्सचे संचालक उद्योजक राजकुमार मोसून, तसेच जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, शासननियुक्त नगरसेवक शांताराम कटके, सौ.अर्चना कटके, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस प्रदीपभाऊ कंद, संजयआप्पा सातव, संपतआबा गाडे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मोनिका हरगुडे, सौ. वसुंधरा उबाळे, घोडगंगाचे माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे, पी.के.गव्हाणे, कैलासराव सोनवणे, कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे, विजयराव गव्हाणे, अमोल गव्हाणे, अशोक काशिद, ॲड.शिवाजीराव वाळके, आदींसह पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना आमदार कटके म्हणाले, ग्राहकांची गरज ओळखून ‘गिरिराज’ ज्वेलर्सच्या ‘सोनी’ परिवाराने आपल्या विविध शाखांच्या माध्यमातून विनम्र सेवा व सचोटीपूर्ण व्यवहाराद्वारे ग्राहकांचा विश्वास संपादन करून ज्वेलरी क्षेत्रात एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली आहे. कोरेगाव भीमा येथे सोनी परिवाराने स्वमालकीच्या अद्ययावत कॉम्प्लेक्समध्ये साकारलेली सोन्या चांदीच्या  दागिन्यांची उत्कृष्ट दालने ग्राहकांच्या  निश्चितच पसंतीस उतरतील, असाही विश्वास श्री. कटके यांनी व्यक्त केला.

   तर माजी आमदार ॲड.अशोक पवार यांनीही गिरीराजचा यशस्वी प्रवास हा व्यवसायातील सातत्यपूर्ण पारदर्शक सेवा, अथक परिश्रम व प्रामाणिकपणाचेच प्रतिक असल्याचे सांगत नव्याने उभारलेल्या आधुनिक आकर्षक वास्तूचेही कौतुक केले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी समिक्षा गोकुळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी (नि.) अरविंद गोकुळे आदीसह उपस्थित वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही सोनी परिवाराच्या व्यवसाय कौशल्य व ‘गिरीराज’ च्या विश्वासार्ह सेवेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवर महिला भगिनींच्या हस्ते केकही कापण्यात आला.

    यावेळी ‘गिरीराज’चे संचालक गणपतलाल सोनी, जगदिश सोनी, निरंजन सोनी, किसन वर्मा, उषा सोनी, देवेंद्र सोनी, पवन सोनी यांच्यासह सोनी परिवारातील सर्व सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. याप्रसंगी कॉन्ट्रॅक्टर संकेत केशवराव फडतरे तसेच आर्किटेक्ट रोहन शरद पाबळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला. निवेदक अतुल बनकर व अमोल दरेकर यांनी सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी गिरीराजच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

….‘पाच का धमाका’ या ऑफरला सर्व शाखांत उत्स्फूर्त प्रतिसाद !

दरम्यान शुभारंभ व दिवाळीनिमित्त ३१ ऑक्टोबरपर्यंत वाघोली व कोरेगाव भीमा येथे गिरीराज ज्वेलर्स, चंदन नगर येथील गजलक्ष्मी ज्वेलर्स तसेच पुणे येथील सातारा रोड व धनकवडीतील श्रीलक्ष्मी ज्वेलर्सच्या सर्व शाखात सुरु करण्यात आलेल्या ‘पाच का धमाका’ या जोरदारला ऑफरला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या ऑफरदरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ बुलेट मोटारसायकली, ५५ डायमंड नोज पिन्स, ५५५ सोन्याची नाणी, ५५५५ चांदीची नाणी, ५५,५५५ गिफ्ट व्हावचर्सचा लाभ मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button