लक्ष्मीतरू वृक्षाची लागवड करुन कॅन्सर मुक्ती अभियानामध्ये सहभागी व्हावे – पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांचे आवाहन
शिंदेवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर विविध उपक्रमांसह मोठ्या उत्साहात संपन्न
पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर पूर्व हवेलीत शिंदेवाडी येथे मोठ्या उपस्थितीत संपन्न झाले. शिबीराचे उद्घाटन आष्टापूर विभागाच्या मंडलाधिकारी श्रीमती गोरे व तलाठी संजय गारडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. तर समारोप पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना सर्वांनी लक्ष्मीतरु वृक्षाची लागवड करुन कॅन्सर मुक्ती अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपप्राचार्य इंदीरेश भिलेगावकर उपस्थित होते.
शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या आंतर्गत कार्यक्रमाधिकारी प्रियंका वाघमारे, सहाय्यक का. अ. गणेश भुजबळ, गटनिदेशक लक्ष्मण पिंगट आणि विविध व्यवसायाचे ८ शिल्पनिदेशक व ८० विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. शिबिरा मध्ये आर्ट ऑफ लिविंगचे नवचेतना शिबिर, सेंद्रिय शेती, कॅन्सर मुक्त भारत, लक्ष्मी तरु लागवड असे गावामध्ये विविध ठिकाणी पेंटिंग, हस्तलिखित बोर्ड तयार करणे, वेल्डिंग करणे व त्यातून साहित्य निर्मिती करणे असे विविध व्यवसायांचे निदर्शन केले. तसेच इलेक्ट्रिकल वस्तुंची दुरुस्ती व जोडणी ची कामे, वृक्षारोपण संगोपनासाठी झाडांना पाणी दिले व श्रमदान करण्यात आले. तर या तीन दिवसाच्या शिबीरच्या कालावधीत महाराष्ट्राची संस्कृतीचे दर्शन, हरिपाठ, भजन, कीर्तन, व्याख्यान आयोजीत केले. यशोदा ट्रेनर राहुल ढेरे व आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर राहुल चव्हाण यांनी योगा विषयी व शारीरिक व्यायामाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोपासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे उपस्थित होते. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य अशोक साबळे, शिंदेवाडीचे माजी उपसरपंच मोहनराव शिंदे, हरिभाऊ शिंदे, नवनाथ जगताप, सालू मालू पारगावच्या सरपंच जयश्री ताकवणे, उदयोजक राजाभाऊ ताकवणे, शिंदेवाडी सरपंच संदीप जगताप, उपसरपंच संतोष शिंदे, दिलीपराव शिंदे, पिंपरीचे सरपंच प्रकाशराव बोरडे, स्टार महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक राजेंद्र शिंदे यांच्यासह आयटीआय विभागाचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणेचे उपसंचालक रमाकांत भावसार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामधील सहभागी प्रशिक्षणार्थी व सदस्यांचे सर्वांगीण कार्यक्रम घेतल्याबद्दल अभिनंदन केले व श्रमसंस्कार शिबिरास विशेष सहकार्य करणारे प्रभाकर जगताप यांचे आभार प्रदर्शित केले .कॅन्सरपासुन मुक्ती देणारा लक्ष्मीतरू वृक्ष असून आमचे बरोबर राजकारणात काम करणारा प्रभाकर जगताप राजकारण सोडून आज आगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करीत आहे. शिंदेवाडी अष्टापूर येथे प्रभाकर जगताप यांच्या उपक्रमाला भेट दिली तर ६५ एकर गायरानावर या लक्ष्मीतरु वृक्षांची लागवड केलेली आहे. आर्ट ऑफ लिवींगच्या माध्यमातुन जगताप प्रभाकर यांनी हा उपक्रम केलेला असून कमी पाण्यावर हा वृक्ष येतो याचे अनेक फायदे आहेत. उपक्रमाला भेट देऊन समाधान प्रकट केले. सर्वांनी लक्ष्मीतरु वृक्षाची लागवड करुन कॅन्सर मुक्ती अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले.
– – – – –