फ्रेंड्स स्कुलच्या स्नेहसंमेलनात विविध कलागुणांचे दर्शन, मान्यवरांकडून कौतुक
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते गौरव मालनकर, अंकुश काने, पंकज पंचारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

पुणे : येथील फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित फ्रेंड्स स्कूलच्या ३२ व्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध नाट्य व गीतांच्या सादरीकरणातून आपल्या कलागुणांसह भारतीय संस्कृतीचेही दर्शन घडवले.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित फ्रेंड्स नर्सरी, प्रायमरी, सेकंडरी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकत्याच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते गौरव मालनकर, अंकुश काने, पंकज पंचारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात लोककला, भारुड, नृत्य प्रबोधन शिवकालीन नाटक धर्मवीर संभाजी महाराज बलिदान, महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण प्रसंग, नाटक, विनोद, किस्से, आई-वडिलांची महती, असे विविध कार्यक्रम मोठ्या दिमाखात सादर करण्यात आले. यावेळी विविध क्रिडास्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, सचिव दिलीप भोसले , खजिनदार डॉ. संजय पाटील, संचालक सुनील दुगड, रामदास सव्वाशे, सरपंच संदीप ढेरेंगे, ग्रामपंचायत सदस्या वंदना गव्हाणे, रेखा ढेरंगे, विस्ताराधिकारी राजेंद्र टिळेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सैंदाणे, उपमुख्याध्यापिका, सौं.नायर आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
‘आपल्या अभिनयाची सुरुवात शालेय स्नेहसंमेलनमध्ये झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांमधील कलागुणांना चालना देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन हे उत्तम व्यासपीठ असल्याचे व फ्रेंड स्कूलने हे व्यासपीठ अधिक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याचे यावेळी अभिनेते गौरव मालनकर यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सांगत शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका ज्योती सैदाणे व वैशाली धर्माधिकारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर संस्थेचे सचिव दिलीपराव भोसले यांनी आभार मानले
……………….



