माजी सभापती मा.भाऊसाहेब साकोरे यांचा अमृतमहोत्सव सोहळा शनिवारी संपन्न होणार
याप्रसंगी 'आनंदयात्री' या चरित्र ग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होणार
पुणे : शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती मा. भाऊसाहेब साकोरे यांचा अमृतमहोत्सव सोहळा व ‘आनंदयात्री’ या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.२ डिसेंबर २०२३ सकाळी ९.३० वाजता राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे मयुरी लॉन्स मंगल कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमाला सडक परिवहन व राजमार्ग मंत्री ना. नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिरूरचे खासदार मा. डॉ. अमोलजी कोल्हे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष श्रीपाल सबनीस, शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोकबापू पवार, जिंतुर-सेलुच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर-साकोरे, वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जगदिश मुळीक, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सुर्यकांतकाका पलांडे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशबापु पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरचे उपाध्यक्ष नारायण गलांडे पाटील, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक प्रकाश गलांडे, केंदुरचे सरपंच अमोलदादा थिटे, वाजेवाडीच्या सरपंच सौ. पुनम चौधरी आदींचे अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी मा.सभापती भाऊसाहेब साकोरे अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, सचिव रंगनाथ हरगुडे, उपाध्यक्ष कांतिलाल गवारे, सहसचिव मारूती सिनलकर, तसेच उद्योजक रविंद्र भाऊसाहेब साकोरे, उद्योजक अविनाश भाऊसाहेब साकोरे आदींसह साकोरे परिवाराचे अनेक सदस्य व केंदुर ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
……..