भारतातील प्रसिद्ध BTSLचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.मच्छिंद्र तिखे यांना थायलंड येथे ‘द थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फ्रान्स’ कडून पीएचडी प्रदान
बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल तर इंडो-थाई इंटरनॅशनल कन्सोर्टियमच्या वतीने ‘इंडो-थाई एक्सलन्स अवॉर्ड देवून गौरव
पुणे : औद्योगिक उत्पादन व विक्रीमधील उल्लेखनिय कार्याबद्दल पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा स्थित BTSL ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मच्छिंद्र उत्तम तिखे यांना थायलंड येथील कार्यक्रमात इंडो-थाई इंटरनॅशनल कन्सोर्टियमच्या वतीने ‘इंडो-थाई एक्सलन्स अवॉर्ड देऊन नुकतेच गौरविण्यात आले. तर बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल ‘द थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फ्रान्स’च्या वतीने डॉ.मच्छिंद्र उत्तम तिखे यांना ‘मानद डॉक्टरेट’ देवून सन्मानित करण्यात आले.
थायलंडमध्ये बँकॉक येथे ‘ग्लोबल ह्युमन राइट्स कौन्सिल फॉर पीस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट युएसए’ च्या पूढाकाराने आयोजित कार्यक्रमात डॉ. मच्छिंद्र उत्तम तिखे यांना द थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फ्रान्सच्या वतीने संचालक डॉ. इसीन युर्डागुल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वरीष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मानद ‘पीएचडी’ डिग्री (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन बिझनेस मॅनेजमेंट) देवून सन्मानित करण्यात आले. तिखे यांनी बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना द थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फ्रान्सच्या वतीने मानद ‘पीएचडी’ डिग्री बहाल करण्यात आली, तर औद्योगिक उत्पादन, व्यवस्थापन व विक्रीमधील उल्लेखनिय कार्याबद्दल इंडो-थाई इंटरनॅशनल कन्सोर्टियमच्या वतीने सिनेअभिनेत्री आमिषा पटेल यांच्या हस्ते ‘इंडो-थाई एक्सलन्स अवॉर्ड देऊन त्यांना गौरविण्यात आले. ऑटोमोटिव्ह तसेच होम ॲप्लायन्सेस उद्योगातील उत्कृष्टतेसाठी आणि सामाजाच्या विकासासाठी दिलेल्या उल्लेयनिय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
याप्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल, थायलंडच्या पंतप्रधानांचे माजी सल्लागार तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक व बँकॉक येथील क्रिक विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. जारण मालुलेम, बँकॉक येथील थम्मसॅट युनिव्हर्सिटीच्या प्रिडी बानोम्योंग इंटरनॅशनल कॉलेजमधील इंडियन स्टडीज प्रोग्रामचे लेक्चरर डॉ. मोहम्मद फहीम, फ्रान्स येथील द थेम्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे शैक्षणिक संचालक डॉ. एर्विन डेलिन टॉरेस, स्कूल ऑफ ग्लोबल स्टडीज थम्मसॅट युनिव्हर्सिटी, बँकॉकचे व्हाईस डीन डॉ. शेख मोहम्मद अल्ताफुर रहमान, बँकॉक येथील क्रिक विद्यापीठाच्या उपाध्यक्षांचे सहाय्यक डॉ. बंडित अरोमन, बँकॉक येथील श्रीनाखरिनविरोट विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंध व राज्यशास्त्र विभागाचे व्याख्याते डॉ. रुस्तुम वंशू, एस. ग्लोबल टेक इंडीयाचे सीएमडी व व्यवस्थापन सल्लागार डॉ.शरद जोशी, आयटी ट्रेडिंग टेक्नॉलॉजी, बँकॉक येथील सीएलएसए सिक्युरिटीज लिमिटेडचे संचालक मोहम्मद इरफान मेमन आदी मान्यवर उपस्थित होते. या गौरवाबद्दल डॉ.मच्छिंद्र उत्तम तिखे व BTSL समूहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापुर्वीही डॉ.मच्छिंद्र उत्तम तिखे व BTSL समूहाला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
BTSL समूहाचे व्यवस्थापन व कामगार वर्गासह सर्वच घटक उद्योगाची वाढ, उच्च गुणवत्ता, तसेच सामाजिक योगदानासाठी एकजुटीने घेत असलेले परिश्रम हेच आमच्या यशाचे गमक आहे. त्यामुळे हा माझा एकट्याचा नव्हे तर आमच्या सर्व टिमचा सन्मान आहे.
डॉ. मच्छिंद्र उत्तम तिखे व्यवस्थापकीय संचालक. BTSL समूह, शिरुर, पुणे, भारत.