यावर्षीही वाघोलीकरांची दिवाळी संगीतमय होणार, ज्ञानेश्वर कटके सोशल फाउंडेशनच्या वतीने यावर्षीही ‘दिवाळी पाडवा पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन
पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुमधूर आवाजात ‘दिवाळी पाडवा पहाट’ कार्यक्रम यंदा १४ नोव्हेंबरला सकाळी साडेपाच वाजता वाघोली बाजारतळावर रंगणार
पुणे : ज्ञानेश्वर कटके सोशल फाउंडेशनच्या वतीने गेली सात वर्षे सुरु असलेला वाघोलीकरांची दिवाळी संगीतमय करणारा ‘दिवाळी पाडवा पहाट’ कार्यक्रम यंदाही पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुमधूर आवाजात येत्या मंगळवारी १४ नोव्हेंबरला सकाळी साडेपाच वाजता वाघोली बाजारतळावर रंगणार आहे.
वाघोलीकरांचा दिवाळी पाडवा संगीतमय करण्याचा श्रीगणेशा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी २०१६ पासून सुरु केला. प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांच्यापासून सुरु झालेला हा संगीतमय सिलसिला त्यानंतर प्रसिद्ध गायक सुरेशजी वाडकर, अवधुत गुप्ते व वैशाली सामंत, आदर्श शिंदे, पुन्हा सुरेशजी वाडकर, साधना सरगम व रोहीत राऊत यांनी संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करीत सुरुच ठेवला. अन् यावर्षीही सुरांची ही मैफल पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुमधूर आवाजात येत्या १४ नोव्हेंबरला सकाळी साडेपाच वाजता रंगणार आहे. अनुराधा पौडवाल यांना गायक स्वप्निल गोडबोले, राधा खुडे, चंद्रशेखर महामुनी यांचीही साथ लाभणार आहे. या कार्यक्रमाची सर्व नागरिकांना मोठी उत्कंठा लागली आहे.
ज्ञानेश्वर कटके सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी पाडव्याला आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाला वाघोलीतील नागरीकांचा दरवर्षी उत्स्फुर्त प्रतिसाद लाभतो. यावर्षीही वाघोलीकरांची दिवाळी संगीतमय करणारा ‘पाडवा पहाट’ कार्यक्रम सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुमधूर आवाजात मंगळवारी १४ नोव्हेंबरला सकाळी साडेपाच वाजता वाघोली बाजारतळावर रंगणार आहे. त्यांच्यासमवेत सुप्रसिद्ध गायक स्वप्निल गोडबोले, सुप्रसिद्ध गायीका राधा खुडे, सुप्रसिद्ध गायक चंद्रशेखर महामुनी हेही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या संगीत मैफिलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे.