लोणीकंद येथे न्यू टाईम्स स्कुलच्या विदयार्थ्यांनी भर पावसातही साकारला पालखी सोहळा
विद्यार्थी दशेतच मुलांना वारी व पालखी सोहळ्याचे महत्व समजावे, या उद्देशाने सोहळ्याचे आयोजन - मारुती भुमकर

पुणे : आषाढी एकादशी निमित्ताने लोणीकंद (ता. हवेली) येथे रामचंद्र एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू टाईम्स इंटरनॅशनल स्कुलच्या विदयार्थ्यांनी भर पावसातही मोठ्या उत्साहात दिंडी व पालखी सोहळा साकारत ग्रामस्थांची मने जिंकली.

टाळ मृदंगाच्या गजरामध्ये लोणीकंद येथे मारुती मंदिरासमोरील प्रांगणात संपन्न झालेल्या या पालखी सोहळ्यात अभंग गायन व लेझीम नृत्यासह फुगड्या घालून रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. तर राजवीर दासगुडे या लहानग्या विद्यार्थाच्या ‘नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’ या अभंग गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
वारकरी संप्रदायाच्या पारंपारिक वेशभुषेत न्यु टाईम्स स्कुलच्या विद्यार्थ्यांनी गळ्यात टाळ आणि विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत पालखीमध्ये ठेवलेल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथाचे पुजन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती भुमकर, सचिव पांडुरंग दत्तात्रय भूमकर व प्राचार्या दिपिका नायडू तसेच शिक्षकांनी पालखी सोहळयाचे सुरेख व्यवस्थापन केले.
या सोहळ्यासाठी माजी उपसभापती नारायणराव कंद, माजी सरपंच श्रीकांत कंद,
सरपंच मोनिका कंद, उपसरपंच सुजाता कंद,
माजी उपसरपंच श्रीमंत झुरुंगे, गजानन कंद, राहुल शिंदे, विठ्ठलराव शिंदे, गौरव झुरुंगे, सागर कंद, रघुनाथ तापकीर, डि.एम.झुरूंगे, दत्तात्रय झुरुंगे, अशोक होले, बाजीराव कंद, अरुण लोखंडे, सोपानराव ढगे, कुंडलिक झुरुंगे आदीसह उपस्थित अनेक मान्यवरांनी पालखी सोहळ्याचे महत्व सांगत शुभेच्छाही दिल्या.
तर परिसरात गुणवत्तेत अग्रस्थानी असलेल्या न्यू टाईम्स स्कुलमध्ये मुलांचे शिक्षण इंग्रजी माध्यमात असले तरी विद्यार्थी दशेतच त्यांना वारी, दिंडी सोहळ्याचे व पालखी सोहळ्याचे महत्व समजावे, या उद्देशाने पालखी सोहळ्याचे आयोजन केल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती भुमकर यांनी सांगितले.



