मराठा आरक्षणासाठी पेरणे ग्रामस्थांचा पाठींबा
पेरणेफाटा येथे लाक्षणिक उपोषणात ग्रामस्थांचा उत्स्फुर्त सहभाग
कोरेगाव भीमा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पेरणे ग्रामस्थांनी महिला भगिनींसह पेरणेफाटा येथे सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत लाक्षणिक उपोषण केले.
उपोषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपोषणासाठी पेरणे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, चेअरमन, शेतकरी बांधव असे सर्व घटक सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचा समारोप शिवाजी महाराजांची आरती करून व राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ. माधुरी नवनाथ वाळके यांनी विशेष परिश्रम घेतले.