सांगवी सांडस येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनास पाठींबा.
राजकीय पुढार्यांना केली गावबंदी
पुणे, : संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला सांगवी सांडस गावातील सकल मराठा समाजाच्या वतीनेही संपूर्ण पाठिंबा व्यक्त करुन राजकीय पुढार्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्या मागण्या मान्य करुन मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत राजकीय पुढार्यांनी गावात येवू नये, अशी भुमिका घेत सांगवी सांडस गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आला. तर आदोलनादरम्यान कुणीही टोकाचे पाऊल उचलू नका, कोणीही आत्महत्या करू नका, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.