डोंगरगावात राजकीय पुढाऱ्यांना नो एन्ट्री. ग्रामस्थांचा मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा
गावाबाहेर लावला फलक
पुणे,: जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाही, अशा आशयाचा फलकच गावाबाहेर लावत डोंगरगाव (ता, हवेली) येथे ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेत एकमताने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
डोंगरगाव ग्रामस्थांनी बैठक घेऊन मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदीचा निर्णय घेत एक मुखाने जरांगे यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. यावेळी गावातील युवकांचा सहभाग मोठा होता.