तुळापूर ग्रामस्थांचा मराठा आंदोलनास पाठींबा
राजकीय पुढाऱ्यांना केली गाव बंदी.
पुणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत हवेली तालुक्यातील तुळापूर गावात मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यास गाव बंदी केली आहे.
श्रीक्षेत्र तुळापूर येथे तुळापूर ग्रामस्थांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर बैठक घेऊन एक मुखाने जरांगे यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन मराठा आरक्षण मिळेपर्यंत तुळापूर गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. तसेच राजकीय कार्यक्रमासही बंदी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरविले आहे. तसे निवेदनही ग्रामस्थांनी प्रशासनास दिले आहे.