विकसित भारताच्या स्वप्नासाठी सुदृढ, सक्षम, सुसंस्कारीत युवा पिढीची गरज
अवर सचिव किसनराव पलांडे यांचे प्रतिपादन
कोरेगाव भीमा : विकसित भारताच्या स्वप्नांसाठी सदृढ सक्षम सुसंस्कारित युवा पिढीची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे अवर सचिव किसनराव पलांडे यांनी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संस्था शिरूर हवेली विशेष गौरव पुरस्काराच्या निमित्ताने गौरीनंदन मंगल कार्यालय सणसवाडी येथे केले.
कार्यक्रमाला माध्यामिक व उच्च माध्यमिक विभागाचे राज्याचे सहसंचालक हरून आत्तार,लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ गणपतराव मोरे,पीएमआरडीए पुण्याचे उपायुक्त रामदास जगताप, पुणे जिल्हा परिषद (माध्य) शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, जिल्ह्याला दिशादर्शक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रेरणा देणाऱ्या उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे निमंत्रक सोमनाथराव भंडारे,सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे,जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त खोमणे साहेबमाहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर,सेकंडरीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,सेकंडरीचे सचिव किशोर पाटील, लोकशाही आघाडी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष जी.के.थोरात, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व सेकंडरीचे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके,सेकंडरीचे तज्ञ संचालक गुलाबराव गवळे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणेचे कार्यवाह महेश शेलार, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे वसंतराव ताकवले,महाराष्ट्र राज्य आश्रम शाळा उपाध्यक्ष तुकाराम शिरसाट,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष रामदास थिटे,पुणे जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष मुरलीधर मांजरे, उपाध्यक्ष अशोकराव दरेकर,
पुणे जिल्हा शिक्षकेतर संघाचे अशोकराव भंडारे,विठ्ठल गवारी, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम,शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे,शिरूर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा निर्मला संकपाळ,शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे गणेश मांढरे,शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे, कार्याध्यक्ष किरण झुरंगे,उपाध्यक्ष शामराव चौधरी शिक्षक नेते बबनराव उकिरडे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहसंचालक हरून आत्तार म्हणाले की शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक तास क्रीडांगणावर खेळू देणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचन,लेखनाविषयीची प्रेरणा निर्माण करून त्याच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होणे अपेक्षित आहे.आनंददायी शिक्षणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि हे काम फक्त शिक्षक बांधवच करू शकतात.
लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे म्हणाले की शिक्षकच क्रांतिकारी आणि अभिनव बदल घडवून आणू शकतात शिक्षकांमध्ये ते सामर्थ्य आहे अशाच पुरस्कार वितरणाच्या माध्यमातून त्यांच्यावर कौतुकाची थाप पडणे गरजेचे आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरूर हवेली माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यक्ष सोमनाथराव भंडारे कार्याध्यक्ष प्रवीण कुमार जगताप उपाध्यक्ष अनिल साकोरे संदीप जगताप रामचंद्र शिवले नितीन माने, सतीश बनकर रावसाहेब थोरात महेश धुमाळ, मारुती दरेकर, राजाराम ढवळे, हरीष शिंदे, श्री. सातपुते सर यांनी परिश्रम घेतले.
तर सुप्रसिद्ध उद्योजक दादा वाजे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सोमनाथराव भंडारे, सूत्रसंचालन प्राचार्य व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्राचार्य अनिल साकोरे व रावसाहेब थोरात यांनी केले तर कार्याध्यक्ष प्रवीणकुमार जगताप यांनी आभार मानले.
—————–