राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडचे महाव्यवस्थापक व वाघोलीचे सुपूत्र मधुकर पाचारणे यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
परस्परांमंधील सांस्कृतिक मैत्रीचा आदर्श राष्ट्रीयपातळीवर जावून मानवतेचे चांगले विचार रुजावेत- डॉ.सबनीस

पुणे : वाघोलीचे सुपूत्र मधुकर पाचारणे हे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रमातून महाव्यवस्थापक या पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा मित्रमंडळी व ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
वाघोली मुस्लिम वेल्फेअर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस सर, ज्येष्ठ शिक्षक श्री.मगर सर, एन.के.निंबाळकर, आमदार ज्ञानेश्वर कटके यांचे बंधू अनंता कटके, स्वीकृत नगरसेवक शांताराम कटके, बाळासाहेब सातव सर, श्री.जाधवराव, श्रीमती मंदाकीनी जाधवराव, आदीसह अनेक मान्यवर तसेच मधुकर पाचारणे यांच्या परिवारातील सदस्यही उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस सर यांनी मधुकर पाचारणे व निवृत्त पोलीस निरीक्षक जानमहम्मद पठाण या हिंदु-मुस्लीम मित्रांचे व्यक्तीमत्व, कार्य व मैत्री आदर्श व कौतुकास्पद असल्याचे सांगत याचा आदर्श समाजाने घेण्याची गरज असल्याचे नमुद केले. तसेच परस्परांमधील मैत्रीच्या सुंदर सद्भावनेचे सोहळे परस्परांकडून साजरे होणे हे धार्मिक सलोख्याचे उत्तम उदाहरण असून सांस्कृतिक मैत्रीचा हा आदर्श राष्ट्रीयपातळीवर जावा व मानवतेचे चांगले विचार रुजावेत, ही अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना मधुकर पाचारणे यांनी आजवरच्या प्रवासाचा आढावा घेताना बालपणापासून शिक्षण, नोकरी सह विविध ठिकाणच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
निवृत्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक जानमहम्मद पठाण यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तर सुनिधी मधुकर पाचारणे हिने आभार मानले.
……….



