शिवम् प्रतिष्ठानच्या वतीने ‘मायभू सेवा’ उपक्रमा अंतर्गत पिंपळे जगताप येथे स्वच्छता उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद
येत्या तीन मार्चला बकोरी वनराई येथे होणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचे साधकांना आवाहन
- शिवम साधक व पिंपळे ग्रामस्थांनी अल्पावधितच स्मशानभूमी परिसर केला चकाचक….
पुणे : शिवम् प्रतिष्ठान, घारेवाडी, या सामाजिक संस्थेच्या पुणे विभागाच्या वतीने ‘मायभू सेवा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे स्मशानभूमी व परिसरात शिवम साधक व ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता करण्यात आली.
शिवम संस्था स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शिवम संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक मा.इंद्रजीत देशमुख उर्फ काकाजी यांच्या संकल्पनेतून वर्षभर ‘मायभू सेवा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत दर महिन्याला दोन तास (2 Hrs with God) विविध गावात श्रमदानातून स्वच्छता करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात पिंपळे जगताप गावातून करण्यात आली.
या सामाजिक उपक्रमात शिवम परिवारातील डॉ.प्रकाश शिंदे, शरद पाबळे, यशवंत गव्हाणे, मधुकर गव्हाणे, अमित कदम, बाबासाहेब गव्हाणे, नितिन ढोरे, सूर्यकांत गव्हाणे, बाळासाहेब नानगुडे, विवेक ढेरंगे, सुभाष शिवले, अमित गव्हाणे, मधुकर कंद श्री.वाळके या साधकांसह पिंपळे जगताप गावातून उपसरपंच सौ रेश्मा नितीन कुसेकर, पोलीस पाटील सौ वर्षा योगेश थिटे, ग्रामपंचायत सदस्य संदीप नानासाहेब जगताप, माहिती सेवा समितीचे उपाध्यक्ष धर्मराज दशरथ बोत्रे, मयुरी लॉन्सचे संचालक गणेश शिवाजी शेळके, योगेश विठ्ठल थिटे, उद्योजक विशाल मोहनराव बेंडभर, छावा संघटक सचिन राजेंद्र कुसेकर, माजी उपसरपंच ऋषिकेश थिटे, कैलास पोपटराव तांबे, रामदास थिटे, पोपटराव पाबळे, लक्ष्मणराव बेंडभर, प्रितम शरद पाबळे, रोहन शरद पाबळे, प्रसाद पोपटराव पाबळे, कौस्तुभ ईश्वर शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष मांदळे हे ग्रामस्थही सहभागी झाले होते.
स्मशानभूमी परिसरात कचरा, पालापाचोळा दगड माती, यासह अनावश्यक गवत, वाढलेली झाडे झुडपे यांची पुर्ण स्वच्छता झाल्यानंतर डॉ. प्रकाश शिंदे यांनी शिवम संस्था तसेच या उपक्रमाची माहिती सांगितली. तसेच पुढील उपक्रम हवेली तालुक्यात येत्या तीन मार्चला सकाळी सात ते नऊ या वेळेत बकोरी वनराई येथे होणार असल्याचे सांगून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले. त्यानंतर साधक व ग्रामस्थ स्वयंसेवकांनी सोबत अल्पोपहार व चहापानाने या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
…….