मराठा आरक्षणासाठी वढु बुद्रुक ग्रामस्थांचे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण
धर्मवीर संभाजीमहाराज समाधिस्थळ चौकात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचा सहभाग
कोरेगाव भीमा : जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी वढु बुद्रुक येथेही ग्रामस्थांनी बुधवारी दिवसभर लाक्षणिक उपोषण केले.
वढु बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळ चौकात सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह अनेक ग्रामस्थांनी सहभागी होत दिवसभर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली.
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी उपोषण आंदोलनाला गावामधील बहुसंख्य लोकांनी सहभाग घेतला आहे. मराठा आरक्षणाविषयी तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.